आरबीआयने अमेरिकन एक्स्प्रेसवरील निर्बंध उठवले

रिझर्व्ह बँकेने बुधवारी अमेरिकन एक्स्प्रेसवरील निर्बंध उठवले.

मध्यवर्ती बँकेने गेल्या वर्षी मे महिन्यात अमेरिकन एक्सप्रेस बँकिंग कॉर्पवर भारतातील 

व्यवसायबंदी लागू केली होती आणि त्यात नवीन ग्राहक जोडण्यापासून रोखले होते.

मात्र, ही बंदी उठल्यानंतर पुन्हा एकदा कंपनी नव्या ग्राहकांना कार्ड देऊ शकणार आहे.

पेमेंट सिस्टीम डेटा स्टोअरेजशी संबंधित नियमांचे पालन न केल्यामुळे 

आरबीआयने अमेरिकन एक्सप्रेसवर ही बंदी घातली होती. 

ही बंदी उठवताना आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, 

आता कंपनीकडून डेटा साठवणुकीच्या नियमांचे पालन समाधानकारक आहे.