शिंजो आबे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार अंतिम श्रद्धांजली

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ सप्टेंबर रोजी टोकियोमध्ये माजी

पंतप्रधान शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची योजना आखत आहेत,

अशी माहिती जपानी सरकारी अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. आबे यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेले मोदी

या दौऱ्यात पंतप्रधान फुमियो किशिदा यांचीही भेट घेणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

मोदी यांनी मे महिन्यात जपानला शेवटचा दौरा केला होता, त्यावेळी ते किशिदा यांनी आयोजित केलेल्या क्वाड ग्रुपिंग परिषदेला उपस्थित होते

त्यावेळीही मोदी यांनी आबे यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती.

शिंजो आबे हे जपानचे सर्वाधिक काळ कार्यरत असलेले पंतप्रधान होते.

गेल्या महिन्यात हाऊस ऑफ कौन्सिलर्सच्या १० जुलै रोजी झालेल्या निवडणुकीपूर्वी 

पश्चिम जपानमध्ये स्टम्प स्पीच देताना त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.