कमाल आर खानला 2020 च्या वादग्रस्त ट्वीट्सप्रकरणी अटक

Image Credit - Google

कमाल आर खान आपल्या वादग्रस्त ट्विटसाठी ओळखला जातो. इरफान आणि ऋषी कपूर यांच्यावर सोशल मीडियावरील हल्ल्याप्रकरणी 2020 मध्ये केआरकेवर 

Image Credit - Google

गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. केआरकेविरोधात लूकआऊट नोटीस बजावण्यात आली होती, त्यानंतर 2020 मध्ये त्याच्याविरोधात

Image Credit - Google

एफआयआर दाखल करण्यात आला होता. युवासेनेचे सदस्य राहुल कनाल यांनी फिर्याद दिली होती. त्याला आज ३० ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता बोरिवली कोर्टात

Image Credit - Google

हजर करण्यात येणार आहे. आयपीसीच्या कलम 153 ए, 294, 500, 501, 505, 67, 98 अंतर्गत त्याला अटक करण्यात आली. "माझ्या तक्रारीवरून कमल आर 

Image Credit - Google

खानला आज अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या या कारवाईचे मी स्वागत करतो. तो सोशल मीडियावर अपमानास्पद टिप्पण्या करतो आणि चुकीची भाषा वापरतो.

Image Credit - Google

अशा प्रकारचे वर्तन समाजात अस्वीकारार्ह आहे. त्याला अटक करून मुंबई पोलिसांनी अशा लोकांविरोधात कडक संदेश दिला आहे," असं राहुल कनाल यांनी म्हटलं आहे.

Image Credit - Google

कमाल आर खान अनेकदा बॉलिवूडवरच्या उघड हल्ल्यांमुळे चर्चेत असतो.

Image Credit - Google

त्याने अनेक हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि प्रकल्पांची निर्मितीही केली आहे.

Image Credit - Google